पिकअप-ट्रक अपघातात सावरटजवळ एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:19 IST2019-11-23T13:19:26+5:302019-11-23T13:19:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : पिकअप व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाल्याची ...

पिकअप-ट्रक अपघातात सावरटजवळ एक जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : पिकअप व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर सावरट गावाजवळ शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रानुसार, धुळ्याकडे जाणारी ट्रक व व्याराकडे जाणारी पिकअप व्हॅन यांची सावरट गावाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात पिकअपमधून प्रवास करत असलेले व्यारा येथील व्यापारी इस्माईल खान (40) यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांचे मूळ गाव चोटेल, जि.बारमेर (राजस्थान) असे आहे. पिकअपमध्ये असलेले सहप्रवासी महंमद खान व बहादूर खान हे दोन्ही किरकोळ जखमी झाले. जखमींवर नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाल्याने दिवसेंदिवस अपघात वाढले आहेत.