डोडवा फाटय़ाजवळ अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:19 IST2019-06-05T11:18:51+5:302019-06-05T11:19:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील डोडवा फाटय़ाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला़ ही घटना रविवारी रात्री ...

One killed in road accident near Dodwa Phataay | डोडवा फाटय़ाजवळ अपघातात एक ठार

डोडवा फाटय़ाजवळ अपघातात एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील डोडवा फाटय़ाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला़ ही घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली़ 
ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर डोडवा फाटय़ाजवळ जीजे 22 के 4374 या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली़ यात दिलीप नरशी तडवी (22) रा़ देवरुपण ता़ सागबारा जि़ नर्मदा हा युवक जागीच ठार झाला़  मोलगी जवळील मालसंबार येथे नातेवाईकास सोडण्यासाठी मयत दिलीप हा गुजरातमधून आला होता़ सायंकाळी नातेवाईकाला मालसांबर येथे सोडल्यानंतर तो परतीच्या प्रवासाला निघाला होता़ दरम्यान डोडवा फाटय़ाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला़ नरशी रुपजी तडवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पावरा करत आहेत़ 

Web Title: One killed in road accident near Dodwa Phataay