रिक्षा उलटल्याने एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:33 IST2019-05-29T12:33:52+5:302019-05-29T12:33:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील वसलाई ते भांगडा रस्त्यावर भरधाव वेगातील रिक्षा उलटल्याने एक ठार तर दोघे जखमी ...

रिक्षा उलटल्याने एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील वसलाई ते भांगडा रस्त्यावर भरधाव वेगातील रिक्षा उलटल्याने एक ठार तर दोघे जखमी झाल़े सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़
भांगडा येथील संदीप दिवान वसावे हा रिक्षातून प्रवासी घेत भांगडा गावाकडे जात होता़ भरधाव वेगात जाणारी रिक्षा एका वळणावर चालक संदीप वसावे याचा ताबा सुटल्याने उलटली़ यातून आत बसलेल्या प्रवाशांना गंभीर जखमा झाल्या़ दरम्यान अश्विन तुकाराम गावीत (31) रा़ भांगडा यास जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला तर विवेक मदन वसावे व चालक संदीप वसावे हे दोघेही जखमी झाल़े याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात विवेक मदन वसावे रा़ भांगडा याने दिलेल्या फिर्यादीवरुन चालक संदीप वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गावीत करत आहेत़