कोपर्ली येथे वीज पडून एकजण ठार

By Admin | Updated: June 9, 2017 17:30 IST2017-06-09T17:30:17+5:302017-06-09T17:30:17+5:30

कोपर्लीसह परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसात वीज पडून सुपडू भू:या भिल (वय-50) या इसमाचा जागीच मृत्यू झाला.

One killed in a power plant in Koperi | कोपर्ली येथे वीज पडून एकजण ठार

कोपर्ली येथे वीज पडून एकजण ठार

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.9 : तालुक्यातील कोपर्लीसह परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसात वीज पडून सुपडू भू:या भिल (वय-50) या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन गायी देखील या घटनेत दगावल्या. 
कोपर्लीसह परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरू असतांना सुपडू भिल हे घराजवळील गोठय़ात बांधलेल्या गायींना सोडण्यासाठी गेले असता अचानक त्यांच्या जवळ असलेल्या झाडावर वीज कोसळली. त्यात भिल यांनाही जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह गोठय़ात बांधलेल्या दोन गायी देखील दगावल्या. दरम्यान, कोपर्लीसह परिसरात शुक्रवारी दुपारी अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला.

Web Title: One killed in a power plant in Koperi