मोटारसायकल अघातात एक ठार

By Admin | Updated: February 5, 2017 00:32 IST2017-02-05T00:32:03+5:302017-02-05T00:32:03+5:30

बिलगव्हाण येथील घटना : उपचार घेताना मृत्यू

One killed in motorcycle assault | मोटारसायकल अघातात एक ठार

मोटारसायकल अघातात एक ठार

नंदुरबार : भरधाव मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना 3 रोजी बिलगव्हाण, ता.नवापूरनजीक घडली.
चेडापाडा, ता.नवापूर येथील रमेश वेच्या पाडवी (30) हा आपल्या मोटारसायकलीने भरधाव वेगात चिंचपाडाहून बिलगव्हाणकडे जात होता. वळणावर अचानक मोटारसायकल घसरल्याने त्याला मार लागला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. नवापूर पोलिसात नोंद झाली.
 

Web Title: One killed in motorcycle assault