भरधाव रिक्षा उलटल्याने एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:36 IST2019-11-06T12:36:34+5:302019-11-06T12:36:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबारातील धुळे रस्त्यावरील ...

भरधाव रिक्षा उलटल्याने एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबारातील धुळे रस्त्यावरील अग्रवाल पेट्रोलपंप समोर मंगळवारी दुपारी घडली.
जयेश जालमसिंग गावीत (32), रा.पिंपळा, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नंदुरबारकडून नवापूरकडे जाणारी भरधाव अॅपेरिक्षा (क्रमांक जीजे 29- यु 2432) धुळे रस्त्यावरील अग्रवाल पेट्रोलपंप समोर उलटली. अचानक डुक्कर आडवे आल्याने चालक जयेश गावीत याचा ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा दुभाजकाला ठोकली गेली. त्यात चालक गावीत यांना जबर मार लागला. रिक्षातील दोनजण देखील जखमी झाले.
परिसरातील नागरिकांनी लागलीच मदतकार्य राबवून जखमी व मयताला रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहन देखील बाजुला केले. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत जालमसिंग इस:या गावीत यांनी खबर दिल्याने अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार क्षिरसागर करीत आहे.