कंटेनरच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 21:58 IST2019-09-13T21:58:35+5:302019-09-13T21:58:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही फाटय़ाजवळ पायी जाणा:या दोघांना कंटेनरने धडक दिली़ धडकेत एक ठार तर ...

कंटेनरच्या धडकेत एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही फाटय़ाजवळ पायी जाणा:या दोघांना कंटेनरने धडक दिली़ धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आह़े ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली़
लहान राजमोही येथील ब्रिजलाल वसंत वळवी (25) व विरसिंग दमण्या पाडवी (35) हे दोघेही पायी राजमोही फाटय़ाजवळील पुलावरुन जात होत़े दरम्यान मागून आलेल्या कंटेनर क्रमांक आरजे 10 जीबी 1359 याने दोघांना मागून धडक दिली़ धडकेत ब्रिजलाल वळवी याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर विरसिंग पाडवी हा गंभीर जखमी झाला़
याबाबत रोहिदास फत्तू वळवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत करत आहेत़