कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:06 IST2019-09-10T12:06:30+5:302019-09-10T12:06:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव कारचे टायर फुटून जागीच उलटल्याने चालक ठार झाल्याची घटना पाचोराबारी गावानजीक घडली. उपनगर ...

कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव कारचे टायर फुटून जागीच उलटल्याने चालक ठार झाल्याची घटना पाचोराबारी गावानजीक घडली. उपनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
कृष्णा उत्तम नाईक, रा.नारायणपूर, ता.नंदुरबार असे मयताचे नाव आहे. कृष्णा नाईक हे पाचोराबारी ते नंदुरबार रस्त्यावर भरधाव कार चालवून नेत होते. अचानक कारचा पुढील टायर फुटल्याने त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार उलटली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शैलेश पाडवी यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसात अपघाताची नोंद झाली.