बुडीगव्हाण फाट्याजवळ दुचाकी अपघात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 15:32 IST2019-03-09T15:31:59+5:302019-03-09T15:32:24+5:30
युवक जखमी : मयताविरोधात गुन्हा

बुडीगव्हाण फाट्याजवळ दुचाकी अपघात एक ठार
नंदुरबार : म्हसावद रस्त्याने पाडळदा गावाकडे जाणाऱ्या दुचाकीला अपघात होऊन एक ठार तर एकजण जखमी झाला़ गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली़
पाडळदा येथील राहुल मिऱ्या सोनवणे (२२) व त्याचे वडील मिºया जालम सोनवणे (५०) हे दोघेही म्हसावद रस्त्याने पाडळद्याकडे येत असताना बुडीगव्हाण फाट्याजवळ भरधाव दुचाकी घसरुन अपघात झाला़ यात राहुल व मिºया सोनवणे हे दोघेही जखमी झाले़ त्यांच्यावर उपचार सुरु असताना मिºया सोनवणे यांचा मृत्यू झाला़ दरम्यान पोलीसांच्या तपासात भरधाव वेगात दुचाकी चालवून अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्याने मयत दुचाकीस्वार मिºया जालम सोनवणे याच्याविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात राहुल याने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद करत आहेत़ जखमी राहुल याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती आहे़