पांघराण येथे मारहाणीत एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:23 IST2020-03-19T12:23:04+5:302020-03-19T12:23:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतातून ट्रॅक्टर चालवून नेल्याच्या वादातून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना पांघराण, ता.नवापूर येथे ...

One killed in beating | पांघराण येथे मारहाणीत एकजण ठार

पांघराण येथे मारहाणीत एकजण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतातून ट्रॅक्टर चालवून नेल्याच्या वादातून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना पांघराण, ता.नवापूर येथे १७ रोजी सायंकाळी घडली. या मारहाणीत इतर दोघे जबर जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेत तिघांना अटक केली आहे.
राजू महादू गावीत (४५) रा.पाघंराण डाबरीफळी, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. तर रविना राजू गावीत व अंकिता राजू गावीत असे जखमींची नावे आहेत. पोलिसांनी अमृत धनजी गावीत, कल्पेश अमृत गावीत व विपूल अमृत गावीत तिन्ही रा.पांघराण यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, अमृत गावीत व राजू गावीत यांचे शेजारी शेत आहेत. राजू गावीत यांच्या शेतात काम करण्यासाठी अमृत गावीत यांच्या शेतातून ट्रॅक्टर गेले. त्याचा जाब अमृत गावीत यांनी विचारला असता त्याच्यावरून दोघांमध्ये वाद झाला. अमृत गावीत व त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि कल्पना जीवन वसावा, रा,उच्छल यांनी राजू गावीत व त्यांच्या दोन्ही मुलींना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. मारहाणीत राजू गावीत यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला तर रवीना व अंकिता या दोन्ही बहिनी जबर जखमी झाल्या.
याबाबत रवीना गावीत यांच्या फिर्यादीवरून अमृत, कल्पेश, विपूल गावीत व कल्पना वसावा यांच्याविरुद्ध नवापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पना वसावा वगळता तिघांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरिक्षक व्ही.एच.राजपूत करीत आहे.
दरम्यान, या घटनेतील एक संशयीत हे गुजरातमधील उच्छल येथील राहणारे आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. घटनेमुळे मात्र गावात खळबळ उडाली आहे.

Web Title: One killed in beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.