भरधाव दुचाकी घसरून एक जण ठार, दुसरा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST2021-04-25T04:30:32+5:302021-04-25T04:30:32+5:30

नंदुरबार : भरधाव डंपरने कट मारल्याने भरधाव दुचाकी घसरून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुजरजांभोली, ता.नंदुरबार नजीक घडली. याबाबत उपनगर ...

One killed, another injured | भरधाव दुचाकी घसरून एक जण ठार, दुसरा जखमी

भरधाव दुचाकी घसरून एक जण ठार, दुसरा जखमी

नंदुरबार : भरधाव डंपरने कट मारल्याने भरधाव दुचाकी घसरून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुजरजांभोली, ता.नंदुरबार नजीक घडली. याबाबत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योेगेश सुरेश ठाकरे (२५) रा.गुजर जांभोली, ता.नंदुरबार असे मयताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, सुनील मस्तान कोतवाल, रा.गुजर जांभोली हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३९- एफ६४४८) जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने कट मारला. त्यामुळे दुचाकीचे संतुलन जाऊन ती रस्त्याच्या बाजूला घसरली. या अपघातात योगेश ठाकरे हे ठार झाले तर सुनील कोतवाल हे जखमी झाले. याबाबत हवालदार पितांबर जगदाळे यांनी फिर्याद दिल्याने सुनील कोतवाल याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रशांत राठोड करीत आहे.

Web Title: One killed, another injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.