बिजरीगव्हाण येथे अपघातात एक ठार
By Admin | Updated: June 22, 2017 12:48 IST2017-06-22T12:48:46+5:302017-06-22T12:48:46+5:30
अक्कलकुवा तालुक्यात बिजरीगव्हाण येथे ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला़

बिजरीगव्हाण येथे अपघातात एक ठार
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.22- अक्कलकुवा तालुक्यात बिजरीगव्हाण येथे ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला़
सिंदुरीचा राणी डुंगरपाडा ता़ अक्कलकुवा येथील हुण्या टेंब:या वळवी सोमवारी सायंकाळी घराकडे जात असताना, त्यांना अज्ञात ट्रॅक्टरचालकाने धडक देऊन दुखापत केली़ यावेळी गंभीर जखमी झालेल्या हुण्या वळवी यांना मोलगी येथे दाखल करण्यात आले होत़े मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आह़े घटनेनंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला़ याबाबत वामन सिंगा वसावे यांच्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात फरार ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े