मालवाहू रिक्षा उलटल्याने एक ठार, 10 जण जखमी
By Admin | Updated: April 24, 2017 23:23 IST2017-04-24T23:23:18+5:302017-04-24T23:23:18+5:30
कोंडाईबारीतील घटना : तीन दिवसांनंतर फिर्याद

मालवाहू रिक्षा उलटल्याने एक ठार, 10 जण जखमी
नंदुरबार : मालवाहू रिक्षामध्ये प्रवासी बसवून नेत असताना भरधाव रिक्षा उलटल्याने एकजण जागीच ठार तर दहाजण किरकोळ जखमी झाल्याची घटना कोंडाईबारी, ता.नवापूर येथे 20 रोजी घडली. याप्रकरणी 23 रोजी रात्री चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळेकडून सुरतकडे मालवाहू रिक्षामध्ये (क्रमांक एमएच 18-एए 4448) 10 ते 12 प्रवासी बसवून चालक रणछोड हिरा पवार हे भरधाव जात होते. कोंडाईबारी घाटातील मोरकारंजा गावाजवळील वळणावर रिक्षा अचानक उलटली. त्यात बसलेल्या प्रवाशांपैकी सुरेश लखा राठोड (25) रा.साक्री, श्रावण सोना राठोड रा. नांदरेखेडा व विकास हिंमत जाधव रा.उमर्दे, ता.नंदुरबार हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी सुरेश राठोड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय इतर प्रवाशांनादेखील किरकोळ दुखापत झाली. या घटनेच्या चौकशीनंतर पोलीस नाईक भीमसिंग ठाकरे यांनी फिर्याद दिल्याने चालक रणछोड पवार रा.डोलीपाडा, ता.साक्री याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.