ब्राह्मणपुरी-जवखेडा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:39 PM2020-01-11T12:39:11+5:302020-01-11T12:39:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी-जवखेडा रस्त्यावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा ...

One injured in tractor collision on Brahmanpuri-Jawkheda road | ब्राह्मणपुरी-जवखेडा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत एक जखमी

ब्राह्मणपुरी-जवखेडा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत एक जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी-जवखेडा रस्त्यावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती़
बुधवारी सायंकाळी मनोहर दादू मुसळदे आणि सुनील शिवा शेमळे दोघे रा़ जवखेडा हे एमएच १५ ई ९३१९ या दुचाकीने जवखेडा येथील घरी जात असताना समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या विनाक्रमांक ट्रॅक्टरने त्यास धडक दिली़ यात मनोहर मुसळदे व सुनील शेमळे हे दोघेही जखमी झाले़ दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर पोलीसात नोंद झाली़ याबाबत मनोहर मुसळदे याच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: One injured in tractor collision on Brahmanpuri-Jawkheda road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.