मोटारसायकल अपघातात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:25 IST2019-08-30T12:25:07+5:302019-08-30T12:25:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड गावातून जाणा:या रस्त्यावरील दुभाजकावर मोटारसायकल आदळल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची ...

One injured in motorcycle accident | मोटारसायकल अपघातात एक जखमी

मोटारसायकल अपघातात एक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड गावातून जाणा:या रस्त्यावरील दुभाजकावर मोटारसायकल आदळल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, सध्या कोळदा-खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रायखेड येथे रस्ता रुंदीकरण करून दुभाजक बसविण्यात आले आहेत. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पानसेमलकडून शहादाकडे जाणा:या मोटारसायकलस्वाराला (क्रमांक एम.पी.46 एम.क्यू.3817) दुभाजक दिसून आले नाही. त्यामुळे मोटारसायकल दुभाजकावर आदळून मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. घटनास्थळी रायखेड येथील ग्रामस्थांनी  धाव घेत जखमीला खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यात आले.
रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी
मध्य प्रदेशला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. सद्यस्थितीत कोळदा-खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या रस्त्यादरम्यान येणा:या गावांमधून जाणा:या रस्त्यावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. हे दुभाजक रात्रीच्यावेळी वाहन चालकांच्या लक्षात यावेत म्हणून रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे.

Web Title: One injured in motorcycle accident