ओहवा येथे एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:08 IST2019-04-17T12:08:30+5:302019-04-17T12:08:54+5:30
चौघांविरोधात गुन्हा : बैलाचा मोबदला मागिल्याचा राग

ओहवा येथे एकास मारहाण
नंदुरबार : जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी अक्कलकुवा तालुक्यातील ओहवा येथे घडली़ याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ओहवाचा पाटीलपाडा येथील सोमा भामटा वसावे यांचा बैैल राया भामटा वसावे हा घेऊन गेला होता़ दरम्यान बैैल मरण पावला होता़ यामुळे सोमा वसावे यांनी राया वसावे यांच्याकडे मोबदला मागितला होता़ याचा राग आल्याने राया वसावे, टिमकाबाई राया वसावे, वजऱ्या वसावे, विकºया राया वसावे सर्व रा़ पाटीलपाडा यांनी सोमा वसावे व त्यांच्या कुटूंबातील सदस्याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ मारहाणीदरम्यान राया वसावे याने हातातील दगडाने वार केल्याने सोमा वसावे यांच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली़ मारहाण झाली त्यावेळी वसावे यांच्या घरासमोर गावपंच बसून या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते़ घटनेनंतर वसावे व त्यांच्या कुटूंबातील सदस्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाडवी करत आहेत़