शेतीच्या वादातून मांडवीत चौघांची एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:16 IST2018-03-08T12:16:32+5:302018-03-08T12:16:32+5:30

One of the four stabs of food stolen from farming | शेतीच्या वादातून मांडवीत चौघांची एकास बेदम मारहाण

शेतीच्या वादातून मांडवीत चौघांची एकास बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतीचा वाद सुरू असतांनाही संशयीताला घरात राहू दिले. याचा राग येवून चौघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना मांडवीखुर्द, ता.धडगाव येथे घडली. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडवीखुर्द येथील चौधरी रडत्या पटले व खेत्या डेटक्या पटले यांच्यात शेतीचा वाद सुरू आहे. खेत्या पटले यास दिलीप सिना वळवी याने आपल्या घरात आश्रय दिला. त्याचा राग चौधरी पटले यांना आला. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. चौधरी रडत्या पटले, नारसिंग दात्र्या पटले, रामदास रडत्या पटले व दिना खोजल्या पटले सर्व रा.मांडवी खुर्द यांनी दिलीप वळवी यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत दिलीप सिना वळवी यांनी फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार साळवे करीत आहे.

Web Title: One of the four stabs of food stolen from farming