चौघांची एकास फायटरने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:21 IST2019-09-02T12:21:17+5:302019-09-02T12:21:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बहिनीचे नाव घेतो म्हणून चौघांनी एकास लोखंडी फायटर, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना ...

One of the four fighters was killed | चौघांची एकास फायटरने मारहाण

चौघांची एकास फायटरने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बहिनीचे नाव घेतो म्हणून चौघांनी एकास लोखंडी फायटर, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना नंदुरबारात घडली. चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
गणेश अशोक भिल, विशाल आनंद भिल, अजरून आमल्या भिल, सुरेश जंगू भिल सर्व रा.पातोंडा असे संशयीतांचे नाव आहे. विजय पाडवी याच्या बहिणीचे नाव गणेश भिल हा घेत होता. त्याबाबत विचारणा केली असता त्याचा राग येवून चौघांनी विजय पाडवी याला लोखंडी फायटर, लाकडी काठीने बेदम मारहाण  केली. 
याबाबत विजय पाडवी यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार एस. पावरा करीत आहे. संशयीतांना अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही.
 

Web Title: One of the four fighters was killed