किरकोळ वादातून भोरकुंड येथे एकास जमावाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 12:21 IST2019-03-13T12:20:51+5:302019-03-13T12:21:00+5:30

नंदुरबार : भोरकुंड ता़ अक्कलकुवा येथे किरकोळ वादातून एकास जमावाने बेदम मारहाण केली़ सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास ही ...

 One factional assault on Bhorkund in retail dispute | किरकोळ वादातून भोरकुंड येथे एकास जमावाची मारहाण

किरकोळ वादातून भोरकुंड येथे एकास जमावाची मारहाण

नंदुरबार : भोरकुंड ता़ अक्कलकुवा येथे किरकोळ वादातून एकास जमावाने बेदम मारहाण केली़ सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
भोरकुंड येथील दिलीप रोत्या तडवी हे रात्री १२ वाजेच्या सुमारास घरी असताना मागील भांडणाची कुरापत काढत खुमानसिंग तडवी याने वाद घातला़ यादरम्यान नारसिंग तडवी, रमेश तडवी, राकेश तडवी, नायसिंग तडवी, चंद्रसिंग तडवी, भिमसिंग तडवी, गुलाबसिंग तडवी, दिलवरसिंग तडवी, पाच्या तडवी, फुलवंतीबाई तडवी, अमरसिंग तडवी, मंगल तडवी, शिवराम तडवी रायसिंग तडवी सर्व रा़ भोरकुंड यांनी लाठ्या काठ्या व दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली़ यात दिलीप तडवी यांच्यासह त्यांचा वाहनचालक जखमी झाला़ यावेळी मारहाण करणाऱ्यांनी तडवी यांच्या घरातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि खिशातील अडीच हजार रुपये रोख हिसकावून घेतले़
याप्रकरणी दिलीप तडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कचरे करत आहेत़

Web Title:  One factional assault on Bhorkund in retail dispute