ट्रकने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:06 IST2019-07-24T12:06:32+5:302019-07-24T12:06:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पानबारा ता़ नवापुर शिवारात भरधाव ट्रकने समोरुन दिलेल्या धडकेत ...

ट्रकने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पानबारा ता़ नवापुर शिवारात भरधाव ट्रकने समोरुन दिलेल्या धडकेत मोटारसायस्वार जागीच ठार झाला़ मंगळवारी सकाळी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली़
पानबारा शिवारात एमएच 41 जे 9815 ही दुचाकी धुळ्याकडून नवापुरकडे जात असताना समोरुन येणा:या एनएल 01 एसी 9624 या ट्रकने त्यास समोरुन धडक दिली़ धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला़ मयताची ओळख अद्याप पटलेली नाही़ उचीशेवडी ता़ नवापुर येथील पोलीस पाटील मोतीराम गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मोटर अपघाताची नोंद करण्यात आले आहे.