दुचाकी अपघातात कोळद्यानजीक एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:15 IST2020-12-08T13:15:07+5:302020-12-08T13:15:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना कोळदानजीक सप्तशृंगी मंदीरानजीक घडली. याप्रकरणी सकाळी ...

दुचाकी अपघातात कोळद्यानजीक एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना कोळदानजीक सप्तशृंगी मंदीरानजीक घडली. याप्रकरणी सकाळी विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी मध्यरात्री दुचाकी (क्रमांक जीजे ५-बीजे ३६९२) घसरून हा अपघात झाला. मयताचा तोंडाला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. सोशल मिडियावर फोटो व्हायरल झाला होता. याबाबत जयदीप राजपूत यांनी खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मयताचे नाव समजू शकले नाही.