भरधाव वेगातील दुचाकी घसल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:21 IST2019-07-30T12:21:26+5:302019-07-30T12:21:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील दोंडाईचा रस्त्यावर दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू झाला़ रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ...

One dies due to a two wheeler crash | भरधाव वेगातील दुचाकी घसल्याने एकाचा मृत्यू

भरधाव वेगातील दुचाकी घसल्याने एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील दोंडाईचा रस्त्यावर दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू झाला़ रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़ 
सुनिल गोविंद पाटील (44) रा़ जुनागाव मलोणी हे एमएच 39 एएफ 0856 या दुचाकीने लोणखेडा येथे जात होत़े दरम्यान शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील फॉरेस्ट ऑफिस  दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने सुनील पाटील यांचे भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटले यातून रस्त्यावर दुचाकी रस्त्यावर घसरली यात जागोजागी  गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मयत घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े 
याबाबत अनिल परशुराम चौधरी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मयत सुनिल गोविंद पाटील याच्याविरोधात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल शेख करत आहेत़ घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आह़े  
 

Web Title: One dies due to a two wheeler crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.