रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:11 IST2019-09-03T12:11:40+5:302019-09-03T12:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वेखाली आल्याने भादवड, ता.नवापूर येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना वडदा, ता.नवापूर शिवारात घडली. किरण ...

रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेल्वेखाली आल्याने भादवड, ता.नवापूर येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना वडदा, ता.नवापूर शिवारात घडली.
किरण भिसन वळवी (26) रा.भादवड, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. वडदा शिवारात रेल्वे रुळ ओलांडत असतांना अचानक रेल्वे आल्याने त्याखाली त्याचा मृत्यू झाला. याबाबत भिसन धुळजी वळवी यांनी खबर दिल्याने विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार दिलीप गावीत करीत आहे.