वाहनावरुन पडल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:43 IST2020-07-11T12:43:16+5:302020-07-11T12:43:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहिर ते देवमोगरा यादरम्यान भरधाव वेगातील अवैध प्रवासी वाहनावरुन पडल्याने २० वर्षीय ...

वाहनावरुन पडल्याने एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहिर ते देवमोगरा यादरम्यान भरधाव वेगातील अवैध प्रवासी वाहनावरुन पडल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना २५ जून रोजी सकाळी ९ वाजता घडली होती़ याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़
रोशन हात्या तडवी रा़ केवडी ता़ अक्कलकुवा असे मयत युवकाचे नाव आहे़ २५ रोजी तो अक्कलकुवा येथे एमएच ०५ जी २५९१ या वाहनाने येत होता़ दरम्यान वाहनचालक विनायक दमण्या वसावे रा़ मोलगी ता़ अक्कलकुवा याने त्यास वाहनाच्या मागे लटकण्यास सांगितले होते़ यातून अलीविहीर ते देवमोगरा गावादरम्यान वळणावर रोशन याचा हात सुटल्याने तो रस्त्यावर पडला़ यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला़ घटनेनंतर चालक विनायक याने गाडीमालक आणि मयताचे कुटूंबिय यांना चुकीची माहिती दिल्याने अक्कलकुवा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद होती़ परंतु पोलीसांकडून तपास करण्यात आल्यानंतर भरधाव वेगामुळे रोशन याचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीसांनी कारवाई केली़ याबाबत पोलीस नाईक किशोर मोहन वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित विनायक वसावे याच्याविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मरणास कारणीभूत ठरणे तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़