शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शहादामध्ये भीषण अपघात, कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेच्या राज्य अध्यक्षांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:51 IST

शहादा - खेतीया रस्त्यांवरील लोणखेडा जवळील मयूर पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार पलटून कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देशहादा - खेतीया रस्त्यांवरील लोणखेडा जवळील मयूर पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला आहे. अपघातात कार पलटून कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल देशमुख यांचा मृत्यू झाला आहे.  चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

नंदुरबार - शहादा - खेतीया रस्त्यांवरील लोणखेडा जवळील मयूर पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार पलटून कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल देशमुख, रा.पिंपळगाव हरेश्वर, जि.जळगाव यांचा मृत्यू झाला आहे.  तर चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

दोंडाईचा येथून आपल्या बहीण, पाहुणे, आई, भाच्यासोबत मध्य प्रदेश येथील सक्राळी येथे नातेवाईकांकडे प्रा. देशमुख हे आपल्या कार क्रमांक एम. एच १८ .ए. जे ५४६६ ने जात असताना शहादा तालुक्यातील लोणखेडा जवळील मयूर पेट्रोल पंप जवळ अचानक रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्नात कार चालकाने अचानक ब्रेक लावल्याने कार पलटी झाली.

अपघातात अनिल रजेसिंग देशमुख (वय ५०) रा.हरेश्वर पिंपळगाव हे जागीच ठार झाले. तर उर्मिला अनिल देशमुख (वय ४३), भार्गव अनिल देशमुख (वय १८) रा.हरेश्वर पिंपळगाव, हरबाबाई भटेसिंग राऊळ(वय ६०) ,कार चालक कुलदीप भटेसिंग राऊळ (वय ३६) ,रा. दोंडाईचा हे गंभीर जखमी झाले.जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी बबन कोळी, प्रविण लोहार, सुधीर पाटील, रोहित कोळी, सुकलाल चौधरी ,जमादार सर आदी नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत तात्काळ शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू