शहादा येथील विज्ञान महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST2021-06-25T04:22:16+5:302021-06-25T04:22:16+5:30
कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. यावेळी बोलताना डाॅ. पाटील यांनी विद्यार्थी व महाविद्यालयाची ...

शहादा येथील विज्ञान महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा
कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. यावेळी बोलताना डाॅ. पाटील यांनी विद्यार्थी व महाविद्यालयाची गुणवत्ता वाढ या विषयावर स्लाईड प्रोजेक्टरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाचा खरा पाया म्हणजे महाविद्यालय व शिक्षकच असतो. शिक्षकांनी स्वत:ची गुणवत्ता वाढवली तर महाविद्यालय व विद्यार्थांची गुणवत्ता आपोआप वाढते. म्हणून शिक्षकांनी मोठ्या व्यक्तींचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांचे आदर्श अंगीकृत केले पाहिजे, असे सांगितले.
कार्यशाळेत प्राचार्य डॉ. बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाची उंची वाढविली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थी व विद्यापीठ स्तरावरील संपर्क वाढवला पाहिजे. तसेच सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. संस्था, महाविद्यालय व विद्यार्थी यांच्याशी बांधिलकी जपली पाहिजे. चांगले विद्यार्थी घडविले तरच नावारूपाला आलेली संस्था वृद्धिंगत होते. यासाठी प्रत्येक शिक्षकाने संस्था, महाविद्यालयातील नियम जपले पाहिजेत. चाकोरीबद्ध पद्धतीने आपली गुणवत्ता वाढविली पाहिजे.
प्रास्ताविक प्रा.डॉ. कैलास आर. चव्हाण यांनी केले.
कार्यशाळेत प्राचार्य डॉ. सोपान बोराटे, आय.एम.आर.डी. महाविद्यालयाचे प्र. संचालक प्रा. अनिल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मंगला चौधरी यांनी तर आभार प्रा. सचिन पाटील यांनी मानले.
संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील, व्हाईस चेअरमन हिरालाल पटेल, सचिव ए. के. पाटील, संचालक अभिजित पाटील, महाविद्यालयीन विकास समिती सदस्या प्रीती अभिजित पाटील व संचालक मंडळांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.