कुसुमवाडा येथे एक दिवसीय आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:12+5:302021-02-06T04:58:12+5:30

या कार्यक्रमप्रसंगी सिनी संस्थेचे डॉ.सुमीत देवरे यांनी राष्ट्रीय वयोवृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रमाबद्दलची माहिती दिली. राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा ...

One day health camp at Kusumwada | कुसुमवाडा येथे एक दिवसीय आरोग्य शिबिर

कुसुमवाडा येथे एक दिवसीय आरोग्य शिबिर

या कार्यक्रमप्रसंगी सिनी संस्थेचे डॉ.सुमीत देवरे यांनी राष्ट्रीय वयोवृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रमाबद्दलची माहिती दिली. राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम ८० गावात व ८ प्राथमिक केंद्रात सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रम अंतर्गत व्यायाम,योगा, व आरोग्य शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ८ ऍक्टिव्हिटी केंद्र सुरू करण्यात आली आहे. यात वयोवृद्धांचे रक्तदाब,मधुमेह तपासणी करण्यात येते. गाणी, खेळ, गप्पा गोष्टी यांचा माध्यमातून नियमितपणे मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रम अंतर्गत वयोवृद्धांची तपासणी नियमितपणे आठवड्यातील प्रत्येक मंगळवार १०ते १ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. यावेळी कुसुमवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मणीलाल शेलटे डॉ.सी. पराडके, पं.स.चे युवराज शेवाळे, सरपंच सिंधुताई पवार, डॉ.प्रफुल धनगर, सिनी समन्वयक अविनाश नाईक, सुलतान धोबी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुमीत देवरे यांनी केले तर आभार किशोर जाधव यांनी मानले.

Web Title: One day health camp at Kusumwada