स्मशानभूमीतच घेतला एकाने गळफास
By Admin | Updated: January 30, 2017 01:21 IST2017-01-30T01:21:22+5:302017-01-30T01:21:22+5:30
नंदुरबार : स्मशानभूमीतच देवीदास शंकर भवर (56) याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना प्रतापपूर, ता. तळोदा येथे शनिवारी सायंकाळी घडली.

स्मशानभूमीतच घेतला एकाने गळफास
नंदुरबार : स्मशानभूमीतच देवीदास शंकर भवर (56) याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना प्रतापपूर, ता. तळोदा येथे शनिवारी सायंकाळी घडली.
देवीदास हा मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवित होता. 28 रोजी सायंकाळी त्याने स्मशानभूमी परिसरात असलेल्या झाडाला गळफास घेतला. त्याने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची खबर त्याचा मुलगा मनोज भवर याने दिली. त्यावरून तळोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.