शेतीच्या वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:11 IST2020-06-18T12:11:14+5:302020-06-18T12:11:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेती खेडण्याच्या वादातून जमावाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना भांग्रापाणी, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी ...

One beaten up over a farm dispute | शेतीच्या वादातून एकास मारहाण

शेतीच्या वादातून एकास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेती खेडण्याच्या वादातून जमावाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना भांग्रापाणी, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी १० जणांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काठी रस्त्यालगत वनसिंग बाल्या वसावे यांची शेती आहे. त्या ठिकाणी सामसिंग दित्या वसावे व इतर जण शेती खेडत होते. याबाबत वनसिंग वसावे यांनी त्यांना जाब विचारला असता त्यातून वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. वनसिंग वसावे यास जमावाने लाकडी दांडकाने जबर मारहाण केली. तसेच शिविगाळळ करून ठार मारण्याची धमकी दिली. जबर जखमी झालेल्या वनसिंग वसावे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतांना त्यांनी लेख फिर्याद दिली.
याबाबतत वनसिंग यांनी फिर्याद दिल्याने सामसिंग दित्या वसावे, आबला दित्या वसावे, दिपला वसावे, निंबा दित्या वसावे, दिलीप उग्राण्या वसावे, सायसिंग उग्राण्या वसावे, बहादुरसिंग सूरज्या वसावे, गुलाबसिंग आबला वसावे, नितीन सामसिंग वसावे, प्रमोद मोतिसिंग वसावे सर्व राहणार भांग्रापाणीचा पाटीलपाडा, ता.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मोलगी पोलीस करीत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: One beaten up over a farm dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.