घरात शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 10:48 IST2019-07-15T10:48:13+5:302019-07-15T10:48:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घरात तलवार व टोचा लपवून ठेवल्याप्रकरणी नंदुरबारातील शारदानगरातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

One arrested for arms in the house | घरात शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एकास अटक

घरात शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घरात तलवार व टोचा लपवून ठेवल्याप्रकरणी नंदुरबारातील शारदानगरातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीताला अटक करण्यात आली आहे.
सुनील सुभाष ईशी (33) रा.शारदानगर, नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. त्याने घरात तलवार, टोचा ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी घराची झडती घेतली असता दोन्ही हत्यारे मिळून आली. पोलिसांनी दोन्ही हत्यारांसह पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला. सुनील ईशी यास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस शिपाई अनिल बडे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ठाकरे करीत आहे. 
 

Web Title: One arrested for arms in the house