वाण्याविहिर येथे दीड हजार लीटर रॉकेल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:37 IST2020-07-09T12:37:12+5:302020-07-09T12:37:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर खुर्द येथे जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी संयुक्तपणे कारवाई करत ...

वाण्याविहिर येथे दीड हजार लीटर रॉकेल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर खुर्द येथे जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी संयुक्तपणे कारवाई करत १ हजार ५०० लीटर साठा करुन ठेवलेले रॉकेल जप्त केले़ बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली़
जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार व तहसीलदार सचिन मस्के यांनी वाण्याविहिर गावातील किर्तीकुमार अशोकचंद जैन या रॉकेल विक्रेत्याच्या गोडावूनमध्ये बुधवारी अचानक तपासणी केली होती़ दरम्यान याठिकाणी अधिकाऱ्यांना १ हजार ५०० लीटर रॉकेल साठा मिळून आला़ किर्तीकुमार जैन हा रॉकेल विक्रेता असल्याची माहिती आहे़ मात्र त्याने साठा केलेल्या रॉकेलबाबत त्याच्याकडून तालुका किंवा जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली नसल्याचे समजते़ यामुळे पुरवछा विभागाने हे रॉकेल जप्त करण्याची कारवाई केली आहे़ रॉकेल वैध की, अवैध याची पडताळणी पुरवठा विभागाकडून करण्यात आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे़