शालेय शिष्यवृत्ती प्रस्तावासाठी दीड महिन्याची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:48+5:302021-08-24T04:34:48+5:30
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जमाती, विजाभज, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी, शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती, जमाती, विजाभज या ...

शालेय शिष्यवृत्ती प्रस्तावासाठी दीड महिन्याची मुदत
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जमाती, विजाभज, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी, शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती, जमाती, विजाभज या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, नववी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुले व मुलींची शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, विजाभज, विमाप्र मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, इमाव मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना, इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकत असणाऱ्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी) तसेच इतर शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना मंजूर केली जाते.
मुख्याध्यापकांनी यासंबंधित शिष्यवृत्तीचे प्रस्ताव जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगावकर यांनी केले आहे.