साडेअकरा लाखांचे मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:06 IST2019-12-30T12:06:42+5:302019-12-30T12:06:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील नवा नागरमुथा गावाजवळ पोलीसांनी सापळा रचून अवैध मद्यासह दोन चारचाकी वाहने असा साडेअकरा ...

 One and a half lakhs of alcohol seized | साडेअकरा लाखांचे मद्य जप्त

साडेअकरा लाखांचे मद्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यातील नवा नागरमुथा गावाजवळ पोलीसांनी सापळा रचून अवैध मद्यासह दोन चारचाकी वाहने असा साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला़ शनिवारी रात्री पोलीसांनी ही कारवाई केली़ याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे़
अक्कलकुवा तालुक्यात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्यासह पथकाने शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नवानागर मुथा गावाजवळ सापळा रचला होता़ दरम्यान बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरुन अक्कलकुवा शहरात मिनीट्रक येत असल्याचे पोलीसांना दिसून आले़ त्यांनी ते थांबवून चालकाकडे चौकशी केली़ यावेळी चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाने ट्रकची तपासणी केल्यावर त्यात अवैघ मद्याचे १०० खोके आढळून आले़ याप्रकरणी पोलीस पथकाने हितेंद्र महेंद्रसिंग चंदेल यास ताब्यात घेतले आहे़ तपासणी सुरु असताना मिनीट्रकचालक फरार होण्यात यशस्वी झाला होता़
ही कारवाई पोलीस उपअधिक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे उपनिरीक्षक बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक बागुल, पोलीस नाईक अमोल खवळे, शकील शेख, अश्विन ठाकरे, किरण पाडवी चालक पठाण यांच्या पथकाने केली़ कारवाईमुळे तालुक्यातील अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे़


पोलीसांनी ताब्यात घेतलेला संशयित हितेंद्र चंदेल हा चारचाकी वाहनाने मिनीट्रकला मार्ग दाखवत होता़ पोलीसांनी सापळा रचून मिनीट्रकची चौकशी सुरु केल्यानंतर वाहनाने पुढे निघून गेलेला मनमोहनसिंग हा पुन्हा परत आला अन पोलीसांच्या हाती लागला होता़ अवैध मद्याचे खोके असलेल्या मिनीट्रकला मार्ग दाखवणा दोघांनाही पोलीसांनी चारचाकी वाहनासह हितेंद्र चंदेल यास अटक केली़

Web Title:  One and a half lakhs of alcohol seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.