सव्वा लाखाचे सागवानी लाकूड भूषा येथे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:50 IST2020-08-02T12:50:23+5:302020-08-02T12:50:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भूषा शिवारात नर्मदा काठावर वन विभागाने धाड टाकून एक लाख १५ हजार रुपये किंमतीचे ...

One and a half lakh teak wood seized at Bhusha | सव्वा लाखाचे सागवानी लाकूड भूषा येथे जप्त

सव्वा लाखाचे सागवानी लाकूड भूषा येथे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भूषा शिवारात नर्मदा काठावर वन विभागाने धाड टाकून एक लाख १५ हजार रुपये किंमतीचे सागवान लाकूड जप्त केले. धडगाव वन विभागाने ही कारवाई केली.
धडगाव वन विभागाला भूषा येथे सागवान लाकूड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली असता तेथे एक लाख १५ हजार रुपये किंमतीचे २.५६ घनमिटर सागवान लाकूड आढळून आले. ते जप्त करून बोटीने भूषा येथे आणला तेथून वाहनाने धडगाव येथे जमा करण्यात आला.
ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक जी.आर.रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल एस.बी.रत्नपारखे, वनपाल डी.बी.जमदाळे, वनरक्षक बी.एम.परदेशी, एस.बी.भंडारी, व्ही. जी.पटले, पी.एफ.पाडवी, एम.एच.तडवी, एच.एम.माळी, कु.जे.एम.वळवी, वनमजूर वांगया पाडवी यांनी नंदुरबार विभागाचे उपवनसंरक्षक एस.बी.केवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Web Title: One and a half lakh teak wood seized at Bhusha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.