लग्न मंडपातून वरमातेची दीड लाखाची पर्स लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:30 IST2021-01-20T12:30:27+5:302021-01-20T12:30:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सुरत येथून मुलाच्या लग्नासाठी तळोदा येथे आलेल्या वरमातेची लग्नाच्या मंडपातूनच कन्यादान सुरू असतांना पर्स ...

लग्न मंडपातून वरमातेची दीड लाखाची पर्स लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : सुरत येथून मुलाच्या लग्नासाठी तळोदा येथे आलेल्या वरमातेची लग्नाच्या मंडपातूनच कन्यादान सुरू असतांना पर्स लंपास केल्याची घटना आज घडली. या पर्समध्ये एक लाख ४० हजार रुपयांचा ऐवज होता. तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरत येथिल मिनाबाई रविंद्र गुरव यांचा मुलाचे तळोदा येथिल राजेंद्र पुंडलिक गुरव यांच्या मुलीसोबत १९ जानेवारी रोजी लग्न होते. मुलगा भूषण याचे लग्न झाल्यानंतर त्या पतीसोबत तीन वाजेच्या सुमारास कन्यादानाचा पूजेसाठी मंडपात बसल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली पर्स बाजूलाच ठेवली होती. पूजा झाल्यानंतर त्यांना त्यांची पर्स त्याठिकाणी दिसून आली नाही. पर्सचा शोध घेतला असता ती पर्स कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली असल्याचे लक्षात आले.
या पर्स मध्ये ९० हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज होता. पर्स लंपास झाल्याचे समजताच शोधाशोध करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही. व-हाडी मंडळींमध्ये यामुळे खळबळ उडाली.
मिनाबाई रविंद्र गुरव यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय नाईक करीत आहेत.