मोटारसायकलच्या डिक्कीतून दीड लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:14 IST2019-04-14T12:13:45+5:302019-04-14T12:14:05+5:30

शहरातील घटना : कागदपत्रेही पळवली

One and a half lakh lapses from motorcycle trunk | मोटारसायकलच्या डिक्कीतून दीड लाख लंपास

मोटारसायकलच्या डिक्कीतून दीड लाख लंपास

नंदुरबार : शहरातील बाजारपेठेत भरदुपारी मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले दीड लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे़
अक्राळे ता़ नंदुरबार येथील घनश्याम रामदास मुंडके हे एमएच ३९ डी ८१६० या दुचाकीने शहरात आले होते़ बँकेतून पैसे काढून घेत दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते अक्राळे गावाकडे परत जात होते़ दरम्यान नगरपालिका चौक परिसरातील झेरॉक्स सेंटरसमोर काम असल्याने काही वेळ त्याठिकाणी थांबले़ या दरम्यान त्यांच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ५५ हजार रुपये रोख, फाईल आणि पासबुक चोरट्याने काढून घेतले़ काही वेळाने मुंडके हे दुचाकीकडे परत आले असताना त्यांना डिक्की उघडी दिसली़ आत पाहिले असता, रक्कम व कागदपत्रे मिळून आले नाहीत़ त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत माहिती दिली़ घनश्याम मुंंडके यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत़

Web Title: One and a half lakh lapses from motorcycle trunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.