नंदुरबार जिल्ह्यात दीड लाख कुटूंबांना मिळणार खावटी कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST2021-03-13T04:56:06+5:302021-03-13T04:56:06+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात जवळपास दीड लाख आदिवासी कुटूंबांना खावटी अनुदान दिले जाणार आहे. कुटूंबांनी भरलेल्या फॅार्ममधील कागदपत्रांची छाननी सुरू ...

नंदुरबार जिल्ह्यात दीड लाख कुटूंबांना मिळणार खावटी कर्ज
नंदुरबार : जिल्ह्यात जवळपास दीड लाख आदिवासी कुटूंबांना खावटी अनुदान दिले जाणार आहे. कुटूंबांनी भरलेल्या फॅार्ममधील कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात आली असून लवकरच निधी उपलब्ध झाल्यावर पात्र कुटूंबांना खावटी अनुदान वितरीत केले जाणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दोन आदिवासी प्रकल्प कार्यालये येतात. त्यातील नंदुरबार आदिवासी प्रकल्पा कार्यालयात नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यांचा समावेश आहे तर तळोदा प्रकल्पात तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांचा समावेश आहे. खावटी अनुदानासाठी तीन महिन्यांपूर्वी आदिवासी कुटूंबांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यांच्याकडून फॅार्म भरून घेत आवश्यक कागदपत्रे देखील जमा करण्यात आली आहेत. नंदुरबार प्रकल्पात एकुण ७१ हजार २०० जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कागदपत्रांची छाननी करून पात्र लाभार्थींची यादी कळवून अनुदान प्राप्त झाल्यावर ते त्यांना वितरीत केले जाणार आहे.
तळोदा प्रकल्पाअंतर्गत देखील ८४ हजार पेक्षा अधीक कुटूंबांचे अर्ज आले आहेत. त्यांच्या अर्जांची व कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. लवकरच अंतीम यादी होऊन संबधीतांना खावटी वाटप केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.