अबब़़ शासकीय कार्यालयांकडे पालिकेचे करपोटी दीड कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 13:07 IST2020-08-08T13:06:53+5:302020-08-08T13:07:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची करवसुली नगण्य स्वरूपात होत आहे़ यामुळे तीन कोटी रुपयांचा फटका पालिकेला ...

One and a half crore is due to the government offices | अबब़़ शासकीय कार्यालयांकडे पालिकेचे करपोटी दीड कोटी थकीत

अबब़़ शासकीय कार्यालयांकडे पालिकेचे करपोटी दीड कोटी थकीत



लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची करवसुली नगण्य स्वरूपात होत आहे़ यामुळे तीन कोटी रुपयांचा फटका पालिकेला बसला आहे़ यात सर्वाधिक दीड कोटी रूपयांची थकबाकी ही शासकीय कार्यालयांची असून तगादा लावूनही वसुली होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे़
पालिका हद्दीत ३२ हजार ३९६ मालमत्ताधारक आहेत़ २०१९-२०२० आर्थिक वर्षात मालमत्ताधारकांकडून केवळ ९ कोटी ९६ लाख ७७ हजार रूपयांची वसुली आतापर्यंत होवू शकली आहे़ थकीत रकमेत दीड कोटी रूपयांचा वाटा हा शासकीय कार्यालयांचा आहे़ यात परिवहन महामंडळाकडे २२ लाख ३७ हजार, जिल्हाधिकारी कार्यालय २५ लाख ८४ हजार, पोलीस अधिक्षक कार्यालय २१ लाख ३१ हजार, जिल्हा क्रीडा संकुल १५ लाख ७५ हजार तर शासकीय दूध डेअरीकडे ११ लाख रूपयांचा कर प्रलंबित आहे़ ही आकडेवारी २०१९-२०२० या वर्षातील आहे़ या कार्यालयांच्या प्रशासनाने रक्कम भरावी असे पालिकेचे म्हणणे आहे़ परंतु कोरोनाच्या कामात व्यस्त असलेल्या त्या-त्या कार्यालयांच्या प्रशासनाने अद्याप घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या कराची रक्कम दिलेली नाही़ पालिकेकडून सातत्याने यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे़
पालिकेच्या अखत्यारितएकूण १३ प्रभागात शासकीय कार्यालयांच्या एकूण ५२ मालमत्ता आहेत़ मुख्यालयांसह तालुका स्तरीय कार्यालय, पोलीस ठाणे, पोलीस चौकी, विज कंपनीची कार्यालये यांचा समावेश त्यात आहे़ आजअखेरीस सर्व ५२ आस्थापनांकडे १ कोटी ४८ लाख ३४ हजार ८०२ रुपयांचा कर शिल्लक आहे़ ही आहेत काही प्रमुख कार्यालय़़: थकबाकीदार शासकीय कार्यालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कृषी पर्यवेक्षक तालुका बीज गुणन केंद्र धुळे रोड, सरकारी पोलीस चौकी मंगल गेट, विज मंडळ सबस्टेशन, राज्य परिवहन महामंडळ, शहर पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक टाऊन व तालुका कार्यालय, सब रजिस्ट्रार यांचे कार्यालय, सब ट्रेजरी आॅफिस, तहसीलदार कार्यालय (जुने), तहसील कार्यालय (सबजेल), पंचायत समिती, जिल्हा परिषद एज्युकेशन सोसायटी कार्यालय, म्यु़धर्मशाळा दारूबंदी कार्यालय, राज्य विद्युत मंडळ कार्यालय (बसस्थानकाजवळ), कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद मार्केट यार्ड, बीएसएनएल आॅफिस व निवासस्थान, डिव्हीजनल मॅनेजर धुळे वनविभाग गिरीविहार, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग पटेलवाडी, जुनी पंचायत समिती, फॉरेस्ट डेपो, पोलीस सब इन्स्पेक्टर क्वार्टर टाऊन व निवास स्थान नळवा रोड, डीवायएसपी बंगला, नवी आणि जुनी पोलीस लाईन नळवा रोड, पोलीस व्यायाम शाळा, गटसाधन केंद्र, उपअभियंता जिल्हा परिषद घोडे बांधणी, पत्रा पोलीस चौकी, जळका बाजार पोलीस चौकी आदींचा समावेश आहे़ ४सर्वाधिक रक्कम थकीत असलेली शासकीय कार्यालये प्रभाग १३ मध्ये आहेत़ यात पीडब्ल्यूडी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय निवास्थान, धुळे मध्यम प्रकल्प, शासकीय दूध डेअरी व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन यांचा समावेश आहे़ नगरपालिका प्रशासन सातत्याने थकबाकीदार शासकीय कार्यालयांकडे सपंर्क करत आहे़ इंदिरा गांधी संकुलातील विज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे ३१ लाख रूपयांचे भाडेही थकीत आहे़ वसूली झाल्यास कराच्या रकमेतून पालिकेच्या विकास कामांना चालना मिळून नंदुरबार नगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळणार असल्याचे नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी सांगितले.

Web Title: One and a half crore is due to the government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.