वृद्ध महिलेला संमोहित करून सोनपोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:39 IST2019-11-06T12:39:39+5:302019-11-06T12:39:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वृद्ध महिलेला संमोहित करून तिच्या गळ्यातील 37 हजार 500 रुपयांची सोन्याची पोत चोरटय़ांनी लंपास ...

वृद्ध महिलेला संमोहित करून सोनपोत लांबविली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वृद्ध महिलेला संमोहित करून तिच्या गळ्यातील 37 हजार 500 रुपयांची सोन्याची पोत चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना विसरवाडी येथे 4 रोजी घडली.
विसरवाडी येथे राहणारी मंजुळाबाई सदाशिव चौधरी या दुपारच्या वेळी घरात एकटय़ाच होत्या. ती संधी साधत चोरटय़ाने घरात प्रवेश केला. वृद्धेला संमोहित करून चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची अडीच तोळे वजनाची व 37 हजार 500 रुपये किंमत असलेली सोन्याची पोत काढून घेतली. ज्यावेळी मंजुळाबाई या भानावर आल्या तेंव्हा त्यांना आपल्या गळ्यातील सोन्याची पोत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी घरातील व्यक्तींना ही बाब सांगितली. त्यानंतर शोधाशोध झाली. परंतु उपयोग झाला नाही.
याबाबत अनिल जीवन चौधरी, रा.खांडबारा यांनी फिर्याद दिल्याने विसरवाडी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार विजय तावडे करीत आहे.