जुन्या विहिरी पडल्या अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:34 IST2019-09-11T11:34:43+5:302019-09-11T11:34:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणा:या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी भूजल व जमिनीवरील पाणीसाठे सक्षम असणे गरजेचे ...

Old wells fall into disrepair | जुन्या विहिरी पडल्या अडगळीत

जुन्या विहिरी पडल्या अडगळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणा:या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी भूजल व जमिनीवरील पाणीसाठे सक्षम असणे गरजेचे आहे. विहिरी ह्या भूजल पातळीसह जमिनीवरील पाणीसाठे वाढविण्यासाठी महत्त्वाच्या ठरत असतात. त्यासाठी जुन्या विहिरींची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे जलकार्यकत्र्यामार्फत सांगण्यात येत आहे.
आधुनिकतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे व पाणीसाठय़ाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारचे प्रय} होताना दिसत नाही. आपापल्या सुविधांसाठी प्लॉट व फ्लॅट तेथे कुपनलिका केल्या जात आहे. परंतु याच कुपनलिकांच्या पुनर्भरणासाठी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’  यंत्रणा बसविल्याच जात नाही. जमिनीतील पाणी पातळी केवळ पावसाद्वारेच भरली जाते. जमिनीतील पाणी वापरणा:यांच्या तुलनेत रेन वॉटर हाव्र्हेस्टिंगचे प्रमाण अगदी नगण्य असल्यामुळे पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’मुळे केवळ भूजल पातळीच वाढ होऊ शकते. वाढत्या  तामपानामुळे भूूजलसह भूतळावरील पाणी पातळीतही वाढ होणे काळाची गरज आहे. या दोन्ही प्रकारच्या जलसाठय़ाच्या वाढीसाठी विहिरीच अधिक उपयुक्त ठरणार  आहे. 
नंदुरबार जिह्यात जलसाठे वाढीसाठी मृद व जल संधारणाचे  तलाव, पाझर तलावांसह अन्य विविध कामे व योजनांच्या माध्यमातून प्रय} केले जात आहे. परंतु ही कामे भवितव्याचे उद्दिष्ट साध्य करु शकत नसल्याचे देखील जलतज्ज्ञ, कार्यकत्र्याकडून सांगण्यात येत आहे. या कामांसोबतच विहिरींचे  प्रमाण वाढणे देखील तितकेच गरजेचे आहे. परंतु नव्या विहिरींची कामे खर्चिक व वेळखाऊ ठरते. त्यासाठी परिसरातील वापरात नसलेल्या व दुर्लक्षित विहिरींची दुरुस्ती झाल्यास खर्चापाठोपाठ वेळचाही बचत करता येणार आहे, शिवाय अपेक्षित उद्दिष्ट देखील साध्य होईल.
 

Web Title: Old wells fall into disrepair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.