शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

वृद्ध खातेदारांचा बँकेसमोर ठिय्या

By admin | Updated: January 16, 2017 23:52 IST

मंदाणे येथील स्थिती : पुरेशा चलनाअभावी ग्राहकांचे हाल

मंदाणे : अपूर्ण चलन पुरवठा व अपूर्ण कर्मचा:यांमुळे मंदाणे, ता. शहादा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. सोमवारी संतप्त झालेल्या       वृद्ध महिला व पुरुष ग्राहकांनी दिवसभर बँकेसमोर ठिय्या मांडला होता.मंदाणे येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. गावात दुस:या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नसल्याने मंदाणेसह परिसरातील नागरिकांचे याच बँकेत खाती आहेत. त्यात शासनाच्या संजय गांधी निराधार व इतर योजनांचे लाभार्थी, अपंग वेतन, ज्येष्ठ नागरिक, निवृत्ती वेतनधारक, शासकीय कर्मचारी, शिक्षक, शेतकरी, व्यापा:यांची या बँकेच्या शाखेत मोठय़ा प्रमाणावर खाती आहेत. या बँकेच्या शाखेत आधीच अपूर्ण कर्मचारी असून, कामकाजासाठी पुरेशी जागा नसल्याने ग्राहकांचे प्रचंड हाल होतात. त्यातच 500 व एक हजाराच्या नोटबंदीमुळे  भर पडली आहे. या बँकेला पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याने ग्राहकांना दिवसभर थांबूनही अपेक्षेप्रमाणे पैसे मिळत नाहीत. परिणामी ग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होऊन बाहेरील गावांच्या नागरिकांना येण्या-जाण्याचा  आर्थिक भरुदडही सहन करावा लागतो.मंदाणे येथे सुरू असलेल्या शाकंभरी मातेच्या यात्रेनिमित्त येथे प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीला प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार नितीन गवळी उपस्थित होते. त्यांच्याकडे बँकेतून पुरेसे व वेळेवर पैसे मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या येथील शाखा व्यवस्थापकांना ग्राहकांना पुरेसा चलन पुरवठा करण्यात यावा, याबाबत सूचना दिली होती. परंतु बँकेला अपूर्ण चलन पुरवठा होत असल्याने व कर्मचा:यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांचे           हाल सुरूच आहेत. सध्या मंदाणे         येथे यात्रोत्सव सुरू असल्याने नागरिकांना पैशांची गरज आहे. त्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे.या बँकेतून पैसे काढण्यासाठी होणा:या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारी दिवसभर बँकेच्या आवारातच ठिय्या मांडला होता. ग्राहकांचे होणारे हाल पाहता या बँकेला पुरेसा चलन पुरवठा व कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.     (वार्ताहर)आम्ही सकाळपासून येथे बसून आहोत. परंतु गर्दी जास्त असल्याने व एकच रांग असल्याने हाल होत आहेत.-जायसाबाई भिल, माजी सरपंच व ग्राहक.बँकेत पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याने अडचणी येत आहेत. बँकेला जसजसा चलन पुरवठा होत आहे तसतशी रोख रक्कम देण्याचा आमचा प्रय} आहे. वरिष्ठांनाही वेळोवेळी कळवून चलन पुरवठा वाढविण्याबाबत मागणी केली जात आहे. रक्कम उपलब्ध झाल्यास रात्री आठ वाजेर्पयत बँक सुरू असते.-अनिकेत मंडळ, प्रभारी शाखा प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, मंदाणे