अधिकारी म्हणे नाही पडली गार पण नुकसानीने शेतकरी मात्र बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:49 IST2020-10-22T12:47:44+5:302020-10-22T12:49:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली यात केळी व ...

अधिकारी म्हणे नाही पडली गार पण नुकसानीने शेतकरी मात्र बेजार
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली यात केळी व पपई पिकांसह घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. यावेळी गारपीट झाल्याचा शेतकर्यांचा दावा होता. परंतू गार पडलीच नसल्याचे अधिकारी सांगू लागल्यानंतर शेतकर्यांनी नुकसान दाखवत त्यांची बोलती बंद केली.
बोरदसह न्यू बन, वेळवद, करडे परीसरात मंगळवारी दुपारी १ वाजेपासून वादळी वार्यासह पावसाला सुरूवात झाली होती. यात केळी, पपई, सोयाबीन, ज्वारी, कापूस तसेच इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. सुमारे दीड तास झालेल्या पावसादरम्यान गारपीट झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे होते. वादळामुळे बोरद येथील कालुसिंग पवार व श्रीराम पाटील यांच्यासह इतर घरांचे पत्रे उडाले. तर चंदू जीवन मराठे, नारायण मराठे, गुलाबसिंग राजपूत, राहुल पाटील, संदीप पाटील, अरुण पाटील यांच्या केळी, पपईसह विविध पिकांचे नुकसान झाले. नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर बोरदचे तलाठी विलास चाैरे, मंडळाधिकारी मायाबाई मराठे, कृषी सहायक चंद्रप्रकाश पावरा यांनी या भागात भेटी देत पाहणी करुन पंचनामे केले. दरम्यान परीसरातील १४ शेतकरी आणि दोन घरांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यांच्या अहवालात म्हटले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गारपीट झाल्याच्या माहितीचे मात्र त्यांनी खंडन केले आहे. शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार मात्र गारपीट झाल्याने नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.