अधिकारी व कर्मचा:यांनी निवडणुकीच्या कामाला प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:21 IST2019-09-22T12:20:26+5:302019-09-22T12:21:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्व विभाग प्रमुखांनी विधानसभा निवडणूक कालावधीत निवडणूक कामकाजाला विशेष प्राधान्य देऊन दिलेली जबाबदारी योग्यरितीने ...

अधिकारी व कर्मचा:यांनी निवडणुकीच्या कामाला प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सर्व विभाग प्रमुखांनी विधानसभा निवडणूक कालावधीत निवडणूक कामकाजाला विशेष प्राधान्य देऊन दिलेली जबाबदारी योग्यरितीने पार पाडावी, त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असल्याने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे 24 तासाच्या आत सर्व राजकीय बॅनर काढण्यात यावे व विकासकामांच्या कोनशीला योग्यप्रकारे झाकण्यात याव्यात. घरावर असलेले विविध राजीकीय पक्षांचे ङोंडे काढण्यात यावे. एसटी बसेसवरील शासकीय जाहीराती आणि वाहनांवरील राजकीय पक्षांचे स्टिकर्स काढण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिका:यांचे वाहने जमा करण्यात यावेत. जिल्ह्याच्या सीमेवर आणि महत्वाच्या मार्गावर नाकाबंदी करून अवैध मद्याची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
आचारसंहितेच्या कालावधीत कोणतेही विकासाचे काम नव्याने सुरू करता येणार नाही किंवा नव्या कामांना मंजुरी देता येणार नाही. सर्व यंत्रणांनी कुठल्याही शासकीय योजनेची प्रसिद्धी करू नये. कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येईल याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. पंडीत म्हणाले, गुजरातमध्ये जाणा:या अवैद्य दारूबाबत उत्पादन शुल्क विभागाने प्रमुख मार्गांवर लक्ष द्यावे व पोलीस विभागाच्या सहकायार्ने अशा वाहतूकीला प्रतिबंध करावा.
सर्व विभागांनी आचारसंहितेच्या पालनासाठी समन्वयाने कामे करावे. मागील निवडणुकीत आचारसंहिता भंगाबाबत गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तिंवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. जगदाळे यांनी आदर्श आचारसंहितेबाबत सादरीकरण केले. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आचारसंहिता व माध्यम कक्षाला भेट दिली.
बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.