आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:23 IST2019-07-28T12:22:57+5:302019-07-28T12:23:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करणा:या चौघांविरुद्ध नंदुरबार पोलीस ...

आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत खंडणीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करणा:या चौघांविरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एप्रिल ते 26 जुलै र्पयत हा प्रकार सुरू होता.
नंदुरबारातील दुधाळे शिवारात राहणा:या एका 43 वर्षीय व्यक्तीला लवकुश गवळी, रा.धुळे व इतर तिघांनी अलि फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसे करायचे नसेल तर खंडणीची मागणी केली. यासाठी त्यांनी संबधीताच्या घरी जावून त्यांच्या प}ीलाही धमकवले.
यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या संबधीत व्यक्तीने शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून लवकुश गवळी, रा.धुळे व त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार के.डी.चौधरी करीत आहे.
दरम्यान, पोलिसांनी संशयीताच्या शोधसाठी लवकरच पथक पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.