दुकान सुरू ठेवल्याने शहाद्यात एकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:24 IST2020-03-26T12:23:54+5:302020-03-26T12:24:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी काळात कापड दुकान सुरू ठेवून संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करून शासकीय कर्मचाऱ्याशी हुज्जत ...

दुकान सुरू ठेवल्याने शहाद्यात एकाविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदी काळात कापड दुकान सुरू ठेवून संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करून शासकीय कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी शहादा येथील व्यापाºयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ रोजी ही घटना घडली होती.
प्रदीप धिसालाल जैन, कापड दुकानदार, रा.तूप बाजार असे व्यापाºयाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता जैन यांनी त्यांच्या मालकीचे विजय कलेक्शन हे दुकान उघडले.
जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतरही कापड दुकान उघडवून कोरोनासारख्या संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती केली. याबाबत त्या भागात नियुक्त तलाठी लक्ष्मण सुभाष कोळी यांनी दुकानदार जैन यांना समजवले असता त्यांनी वृत्तवाहिनीचे कार्यालय असल्याची बतावणी केली. परंतु तेथे तसे काहीही आढळून आले नाही.
जैन यांनी पथकाशी अरेरावी करून शासकीय आदेश न पाळल्याने त्यांच्याविरुद्ध लक्ष्मण कोळी यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणने, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाºयास अटक करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरिक्षक निलेश वाघ करीत आहे.