आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:46 IST2020-04-01T12:46:14+5:302020-04-01T12:46:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील एकावर कारवाई करुन गुन्हा दाखल ...

आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील एकावर कारवाई करुन गुन्हा दाखल झाला़ सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली़
महंमद नईम शेख सलीम रा़ अलीसाब मोहल्ला असे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याचे नाव असून तो सोमवारी सायंकाळच्या सुमारास धानोरा रोडवरील माळीवाडा भागात आढळून आला होता़ याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उत्तम पवार यांच्या फिर्यादीवरुन नईमखान शेख सलीम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकरे करत आहेत़