शहादा येथे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:11+5:302021-03-10T04:31:11+5:30

यावेळी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, टोकरेकोळी समाजाचे नितीन कोळी, योगेश डामरे, मयूर भामरे आदी उपस्थित होते. या ...

ODI cricket tournament at Shahada | शहादा येथे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

शहादा येथे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

यावेळी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, टोकरेकोळी समाजाचे नितीन कोळी, योगेश डामरे, मयूर भामरे आदी उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेत खापर येथील विजेत्या संघाला प्रथम बक्षीस ११ हजार रुपये रोख व चषक तर अक्कलकुवा येथील उपविजेत्या संघाला सात हजार रुपये रोख व चषक देण्यात आला. दोन्ही बक्षिसे आमदार राजेश पाडवी यांच्याकडून जाहीर करण्यात आली होती.

प्रा. मकरंद पाटील म्हणाले की, स्पर्धेच्या माध्यमातून समाजाची एकता, संघटन निर्माण व्हावे हा दृष्टीकोन होता. स्पर्धेमुळे शारीरिक व बौद्धिक विकास होतो. मेहतर समाजाने शिक्षणावर भर द्यावा, असे आवाहन केले. स्पर्धेसाठी गणेश डामरे, रोहित डामरे, अजिंक्य डोडवे, कुणाल डोडवे, केदार सोलंकी, संतोष गोजरे, यशवंत गोजरे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: ODI cricket tournament at Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.