शिवणकाम दिनानिमित्त शिंपी युवक संघटनेतर्फे युवकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:24+5:302021-03-01T04:35:24+5:30
२८ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक टेलर डे’ अर्थात विश्व शिवणकाम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून ...

शिवणकाम दिनानिमित्त शिंपी युवक संघटनेतर्फे युवकांचा सन्मान
२८ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक टेलर डे’ अर्थात विश्व शिवणकाम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून रविवारी नंदुरबार जिल्हा शिंपी समाज युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील युवा शिवण कामगारांच्या घरोघरी व दुकानात जाऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा शिंपी समाज युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिंपी यांनी सांगितले की, सुई, दोरा, कातर व शिलाई मशीनवर कर्तब दाखवणारा शिंपी वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसायाचे महत्त्व आजही युवापिढीने टिकवून ठेवले आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांचा पाईक असलेला युवक आज नोकरी नसली तरी पारंपरिक शिवण व्यवसायात समाधानी आहे. कोरोना काळात मास्क बनवून मोफत वितरणाचे केलेले कार्यदेखील उल्लेखनीय आहे. या वेळी सचिव प्रसाद कापुरे, रवींद्र जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.