पाणी परवानगीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:46 IST2020-09-19T12:46:11+5:302020-09-19T12:46:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज पाण्याने तुडुंब भरले आहे. उपसा सिंचन योजना जरी प्रस्तावित असल्या ...

Obstruction of farmers for water permit | पाणी परवानगीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक

पाणी परवानगीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक


लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज पाण्याने तुडुंब भरले आहे. उपसा सिंचन योजना जरी प्रस्तावित असल्या तरी ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक दीर्घकालीन व हंगामी पाणी परवानगी घेतलेली आहे. त्यांना पुन्हा नियमित करतेवेळी प्रकाशा बॅरेज प्रशासनाकडन पाणीपट्टी भरण्याची सक्ती केली जात आहे. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अतिपावसामुळे शेतकरी अडचणीत असताना अशी अडवणूक का? असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज दोन्ही आजच्या स्थितीला पाण्याने तुडुंब भरले आहेत. प्रकाशा बॅरेज अंतर्गत ३७ गावे येतात तर सारंगखेडा बॅरेज अंतर्गत ५६ गावे येतात. प्रकाशा बॅरेज अंतर्गत ७७१ शेतकऱ्यांनी दीर्घकालीन पाणी परवानगी घेतली आहे तर ६८ शेतकºयांनी हंगामी पाणी परवानगी घेतली आहे. सारंगखेडा बॅरेज अंतर्गत ३७५ शेतकºयांनी दीर्घकालीन तर ७९ शेतकºयांनी हंगामी पाणी परवानगी घेतली आहे. पूर्वी दीर्घकालीन (१८ वर्षासाठी) पाणी परवानगी देत होते. आता मात्र हंगामी पाणी परवानगी दिली जात असून दुसºया वर्षासाठी ती नियमित करावी लागते. मात्र त्यासाठी प्रकाशा बॅरेज प्रशासनाकडून अगोदरची थकबाकी भरल्याशिवाय परवानगी नियमित होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे सर्वजण हतबल असताना शेतकरी कसेतरी शेतात पेरणी करून उत्पादन काढण्यामागे आहे. त्यातच यंदा पाऊसदेखील कमी-अधिक होत असल्याने हाती आलेले पीकही वाया जात आहे. मूग, उडीद हे तर वाया गेले आहे. आता सोयाबीनचीही तीच परिस्थिती झाली आहे. दुसरीकडे बॅरेजकडून अगोदर पाणीपट्टी भरण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन पाणीपट्टीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
ााणी परवानगी देत असताना थकबाकीऐवजी शेतकºयांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आधीच कोरोनामुळे हतबल असताना शेतकºयांचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. यासाठी प्रकाशा बॅरेज प्रशासनाने शेतकºयांच्या हिताचा विचार करावा.
-संजय पाटील, शेतकरी.


 

Web Title: Obstruction of farmers for water permit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.