खेतियात लोकप्रतिनिधींकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:37 PM2020-04-02T12:37:34+5:302020-04-02T12:37:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खेतिया येथे करण्यात आलेल्या उपाययोजनांची खासदार गजेंद्रसिंह पटेल यांनी पाहणी ...

Observations from representatives of the people in the fields | खेतियात लोकप्रतिनिधींकडून पाहणी

खेतियात लोकप्रतिनिधींकडून पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खेतिया येथे करण्यात आलेल्या उपाययोजनांची खासदार गजेंद्रसिंह पटेल यांनी पाहणी केली. त्यानंतर सामाजिक अंतर राखत पोलीस, महसूल, आरोग्य विभाग, व पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या वेळी खासदार पटेल यांनी कोरोनाला रोखण्यासाठी खासदार निधीतून एक कोटी तर एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला.
लॉकडाऊन काळात खेतियात पूर्णत: शुकशुकाट असून मध्य प्रदेश-महाराष्ट्र सिमेवर खेतिया-खेडदिगर येथे कडक बंदोबस्त आहे. सीमा तपासणी नाक्यावर येणाºया-जाणाºया नागरिकांची माहिती घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करून पाठविण्यात येत आहे. सिमेवर पोलीस, महसूल, नगरपालिका, ग्रामपंचायत, नगर सुरक्षा समिती कर्मचारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, प्रांताधिकारी सुमेंरसिंह मुजाल्दे, तहसीलदार राकेश सत्या, नायब तहसीलदार जगन्नाथ वास्कले हे सतत भेट देऊन नागरिकांना सूचना देत आहेत. आमदार चंद्रभागा किराडे यांनीही खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली. उपलब्ध सोयींची पाहणी करून उपचारासाठी ज्या साहित्यांची कमतरता आहे त्यांची माहिती घेतली व ते साहित्य लवकरच उपलब्ध करून देऊ, असे सांगितले.
मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर खेतिया येथून महाराष्ट्र, गुजरात राज्यातून अनेक नागरिक घरी जाण्यासाठी कोणी पायी तर कोणी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आहे. चेकपोस्टवर त्यांची माहिती घेऊन त्यांना मिळेल त्या वाहनाने बसवून रवाना करण्यात येत आहे. सोमवारी एक झारखंड येथील रहिवासी सूरत येथे कामाला होता. कंपनी बंद झाल्याने त्याने थेट सुरतहून घरी जाण्यासाठी सायकलीने प्रवास सुरु केला. खेतिया चेकपोस्टवर आल्यानंतर तिथे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला पुढे रवाना केले.

Web Title: Observations from representatives of the people in the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.